रांजणगाव गणपती प्रतिनिधी
रांजणगाव गणपती (ता शिरूर) येथील औद्योगिक वसाहतीमधील भंगार रांजणगाव येथील फंड वस्ती जवळ जाळण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. मात्र या मुळे या परिसरातील जनजीवन विस्कळित होऊ लागले असुन पशुधन,झाडे व मानवी जीवना वर ही त्याचा परिणाम होऊ लागला आहे.
रांजणगाव गणपती येथील काही स्थानिक भंगार व्यावसायिक व काही बाहेर गावचे भंगार व्यावसायिक यांच्या अभद्र युती मुळे या ठिकाणी हा भंगार कचरा आणला जातो. रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यां हा भंगार कचरा विल्हेवाट लावण्यासाठी ठेकेदारांना दिला जातो. परंतु संबंधित ठेकेदार हे या भंगार कचरा वर कोणत्याही स्वरूपाची प्रक्रिया न करता रात्री उशिरा जाळून टाकण्याचा सपाटाच लावला आहे. त्यामुळे या परिसरात झाडांच्या , पशुपक्ष्यांच्या व मानवाच्या जीवनावर परिणाम होऊ लागला आहे.प्रदुषण नियंत्रण महामंडळाने या संबंधित भंगार व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी प्रताप फंड यांनी केली आहे.