सुनील भंडारे पाटील
चालू ऊस गळीत हंगामामध्ये बाजार भाव जाहीर न करता कारखान्यांनी उसाचे गाळप चालू केलें आहे, पहिल्यांदा प्रति टन बाजार भाव जाहीर करावा, अशा मागणीचे पत्र रयत शेतकरी संघटनेच्या वतीने श्रीनाथ म्हस्कोबा सहकारी साखर कारखाना चे चेअरमन यांना देण्यात आले आहे,
पुणे जिल्ह्यात, दौंड तालुक्यामध्ये महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ऊस बागायत क्षेत्रामध्ये श्रीनाथ म्हस्कोबा सहकारी साखर कारखान्याचे महत्व खूप आहे दौंड तालुक्याबरोबर शेजारील शिरूर आणि हवेली तालुक्या मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भरमसाठ ऊस या कारखान्याला जात आहे संबंधित साखर कारखाना चालू होऊन जवळपास एक महिना होत आलेला असून आत्तापर्यंत कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन किती बाजार भाव दिला जाणार याबाबत कुठल्याच स्वरूपाची घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे, तरी तीन ते चार दिवसात प्रति टन किती भाव देणार हे जाहीर करण्यात यावे, तसे न केल्यास रयत शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लेखी स्वरुपात निवेदनाद्वारे देण्यात आला आहे, असे रयत शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष रामदास पाटील बुवा कोतवाल (पाटील) यांनी सांगितले,