सुनील भंडारे पाटील
पिंपरी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पुणे येथील पोलीस उपनिरीक्षक लोकसेवक रोहित गणेश डोळस (वय 41) याला २ लाखांची लाच मागणी प्रकरणी लाचरुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी कारवाई केली आहे,
पिंपरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1138 / 2022 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7,7अ नुसार डोळस याच्यावर कारवाई करण्यात आली असून, पिंपरी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या तक्रारी अर्जावरून यातील तक्रारदाराचे आवाज आरोपी न करणे तसेच तो अर्ज दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक रोहित डोळस यानी दोन लाख लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांना प्राप्त झाली होती, सदर तक्रारीची पडताळणी केली असता डोळस यानी दोन लाख रुपयांची लाच मागणी केली म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला असून डोळस याला अटक करण्यात आली आहे, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करत आहेत,
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने केला,