सुनील भंडारे पाटील
शिक्रापूर पोलीस स्टेशन (तालुका शिरूर) येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले विकास (आबा) दत्तात्रेय कुंभार यांची कामाची दखल घेऊन त्यांची सहाय्यक फौजदार पदावर बढती करण्यात आली,
पुणे जिल्ह्याच्या पूर्वपट्यात महत्त्वाचे समजले समजणारे लोणीकंद पोलीस स्टेशन, तसेच शिरूर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा असणारी शिक्रापूर आणि शिरूर या पोलीस स्टेशनमध्ये गेले 28 वर्षांपासून कुंभार यांनी धडाकेबाज व उल्लेखनीय कार्य, कामगिरी केलेली आहे, त्यांनी या तीनही पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे उघड करून या गुन्ह्यांचा तपास योग्य दिशेने करून आरोपींना योग्य शासन करणे, गजाआड केले आहे, अनेक महत्त्वाच्या गंभीर गुन्ह्यां मधील तपासामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे,
त्यांनी आपल्या 28 वर्षाच्या कारकीर्दीत वरिष्ठांशी, कार्यरत असणाऱ्या सर्व पोलीस मित्रांची, तक्रारदार यांच्याशी वर्तणूक चांगली ठेवली, तसेच आरोपींना त्यांची जागा दाखवली, त्यांच्या या उल्लेखनीय, व धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांचा वरिष्ठ स्तरावर विचार होऊन त्यांना सहाय्यक फौजदार या पदावर नियुक्त करण्यात आले,या बढतीचे पत्र पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले, त्यांच्या या नियुक्ती बद्दल शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे व सर्व स्टाफ यांनी सत्कार केला,आबा कुंभार यांचे या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनचा वर्षाव होत आहे,