सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथे पुणे नगर महामार्गावर सायंकाळच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असून, या वाहतूक कोंडीचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,
जिल्ह्यात महत्त्वाचा समजला जाणारा पुणे नगर महामार्ग, या मार्गावर अनेक वर्षांची वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी, महामार्गाचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आला आहे, कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगाव गणपती, या ठिकाणी असलेली मोठी औद्योगिक वसाहत, रहदारी, तसेच पुढे राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या या महामार्गावर वाहतुकीचा ताण खूप आहे, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने नियोजनबद्ध महामार्गाचे नूतनीकरण केले आहे,
परंतु कोरेगाव भीमा गावामध्ये आठवडे बाजार गुरुवार च्या दिवशी, मुख्य चौक, डिग्रजवाडी फाटा, वाडेगाव फाटा व इतर ठिकाणी प्रवासी वाहतूक रिक्षा, दुचाकी गाड्या, विरुद्ध दिशा( रॉंग साईट ) नी वाहतूक नियम पायंदळी तूडवत सतत ये जा करत असल्याने खूप मोठी वाहतुकीची कोंडी होत आहे, त्यामुळे महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, विरुद्ध दिशेने येणारे वाहनांवर कारवाई करून, येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीची मुक्तता करावी, अशी मागणी नागरिक सतत करत आहेत,