आळंदीत दत्त जयंती उत्साहात साजरी -औदुंबराचे झाड ठरले आकर्षण

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी आरिफभाई शेख.
            श्री तीर्थक्षेत्र आळंदी देवाची मधील कीडा,मुंगी, त्रून ,पाषाण, सर्वच पवित्र मानले जाते, आळंदीमध्ये दत्त जयंती निमित्त विशेष उस्ताह पाहण्यास मिळाला, सर्वत्र असलेल्या दत्त मंदिरांमध्ये एकच अलोट गर्दी दर्शनासाठी भाविकांनी केलेली दिसली, आळंदीच्या नगरपालिका शाळा समोर माऊलींच्या मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर वर्षानुवर्ष असलेले उंबराचे झाड हे विशेष आकर्षण ठरले,
    तेथे भाडेकरू म्हणून असलेले मुंडे हे दरवर्षी या औदुंबर च्या झाडाची सजावट फुलांची आरास करतात,आणि त्यांच्या यथा शक्तीने फराळाचं वाटप करतात, दत्त जयंती निमित्त या औदुंबराच्या झाडास विशेष फुलांची आरास केलेली पाहून भाविकांमध्ये भक्त भावना जागृत होताना दिसली, प्रत्येक जण या औदुंबरला पाहून श्रीदत्त दर्शनाचा अनुभव घेऊ लागला, हिंदू धर्मशास्त्रामध्ये औदुंबराच्या झाडाखाली दत्त दिगंबर दैवत वास, अस्तित्व मानले जाते, त्यामुळे औदुंबराचा झाड, उंबराचे उंबराच पान हे तोडले जात नाही, भाविक भक्तामधे भक्ती भावाने त्या झाडाची पूजा केली जाते,आळंदीतील चावडी चौकाकडून मंदिराकडे जाताना आसलेल्या मराठी नगरपरिषद शाळे समोर असलेले दुकानातले भाडेकरू के के मुंडे यांनी स्थानिक युवकांना बरोबर घेत, तेथे विशेष फुलांचे आरास केली, छोट्याश्या स्पीकरवर देव देवतांची भजन,गाणी ,लावून फराळ वाटत समाधान व्यक्त केले, आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाना प्रसादाचा लाभ घेण्याची हात जोडून विनंती केली, हा उत्साह आळंदीत सर्व ठिकाणी पाहण्यात मिळाला, आळंदीत असलेल्या दत्त मंदिरात भजन कीर्तन सोहळा ही दत जयंती निमीत्त पार पडला आहे
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!