सुनील भंडारे पाटील
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या नावाचा डंका पिटवणारे, अपमान सहन न करणारे आपले शिरूर आंबेगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवरायांचा जयघोष करत संपूर्ण संसद हादरून टाकली,
दिल्ली संसद भवन येथे सद्यस्थितीत हिवाळी अधिवेशन चालू आहे, आज आपल्या राज्यातील अतिशय संवेदन शील मुद्दा म्हणजे आपल्या छत्रपती विषयी राज्यपालांचे चुकीचे विधान यावर आपल्या मतदारसंघाचे खासदार कोल्हे यांनी स्पष्टीकरण देत लक्षवेधक सूचना मांडली, त्यावेळी संसद भवनात कोल्हे यांचा माईक बंद करण्यात आला, परंतु आपल्या दणकेबाज आवाजात खासदार कोल्हे यांनी छत्रपती शिवरायांचे नावाची घोषणा देता, संसद भवन दणाणून टाकले, छत्रपतींचा आवाज कोणीही दाबू शकत नाही याची प्रचिती खासदार कोल्हे यांनी सिद्ध करून दाखवली, शिवाय आपल्या महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवरायांचे महत्त्व अनन्यसाधारण असून, यापुढे आम्ही कुठल्याच प्रकारचा अपमान सहन करणार नाही, छत्रपती विषयी चुकीचे विधान करणाऱ्या विषयी विशेष कायदा करण्यात यावा त्या कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी देखील खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी केली,