सुनील भंडारे पाटील
वारजे माळवाडी पुणे येथे झालेल्या 74 किलो वजन गटामध्ये वढु खुर्द (तालुका हवेली) येथील पैलवान आशुतोष रमेश भोंडवे याची निवड करण्यात आली,
लोणीकंद येथील जाणता राजा कुस्ती केंद्रामध्ये तयार झालेला नावलौकिक असणारे पैलवान संदीप आप्पा भोंडवे यांचा पठ्ठा लहानपणापासून आशुतोषला कुस्ती क्षेत्रामध्ये आवड होती, नुकत्याच झालेल्या वारजे माळवाडी पुणे येथे पुणे जिल्ह्यामधून महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेची चाचणी घेण्यात आली, यावेळी जिल्ह्यातील अनेक पैलवानांनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये हवेली तालुक्यातील पूर्वपट्ट्यातील वढु खुर्द येथील पैलवान आशुतोष भोंडवे याची निवड करण्यात आली, या चाचणी परीक्षेत पास झाल्यामुळे आशुतोष वर अभिनंदनचा वर्षाव होत असून, वढु खुर्द गावामध्ये तसेच पंचक्रोशी मध्ये आनंदाचे वातावरण आहे, या निवडीनंतर जाणता राजा कुस्ती केंद्राचे संस्थापक कीय अध्यक्ष, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे, सरपंच मोहिनी सचिन भोंडवे, पैलवान विकास भोंडवे, व ग्रामस्थांनी आशुतोषचा सत्कार करून, त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या,