सुनील भंडारे पाटील
हवेली तालुक्याच्या पूर्वपट्ट्यामध्ये अत्यंत चुरशीने झालेल्या पेरणे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्राम विकास पॅनलचे सरपंचपदी उषा दशरथ वाळके विजयी झाले असून , एकूण 17 सदस्य जागांपैकी 7 जागा श्री सिद्धेश्वर पाच पीर महाराज ग्रामविकास पॅनल ला मिळाले असून विरोधी श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज पॅनल 7 जागा मिळून बराबरी झाली आहे, अपक्ष ३ उमेदवार विजयी झाले आहेत,
गेल्या काही दिवसापासून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चर्चेत असणारी ग्रामपंचायत निवडणूक पेरणे, या निवडणुकीमध्ये 18 डिसेंबर रोजी मतदान झाले होते, त्यानंतर आज 20 डिसेंबर लागलेल्या निकालाअंती, सरपंच पदासाठी ४ उमेदवारांपैकी श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्राम विकास पॅनलच्या उषा दशरथ वाळके यांचा विजय होऊन त्या सरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्या आहेत, तसेच इतर सहा वार्डामधील एकूण 17 जागांपैकी दोन्ही पॅनलला 7 =7 जागा मिळाल्या तर अपक्ष ३ उमेदवार निवडून आले आहेत, श्री सिद्धेश्वर पाचपिर महाराज ग्रामविकास पॅनेल विजयी उमेदवार असे आहेत, वार्ड क्रमांक 1)गणेश येवले, अश्विनी रुपेश ठोंबरे,2) अक्षय ज्ञानेश्वर वाळके, अंकिता सरडे, शैला ढेरंगे,5) सुजय सुदाम वाळके, अलका मोहन वाळके,
त्याचप्रमाणे श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज पॅनल चे विजयी उमेदवार असे आहेत वार्ड क्रमांक ३) कल्पना वाळके, विश्वास वाळके, सुनील अवचार,4) दीपक वाघमारे, दिनेश वाळके, मंगल वामने,
अपक्ष विजयी उमेदवार वार्ड क्रमांक 6)अशोक कदम, दीपक वाळके, नंदा ढवळे, अशा पद्धतीने दोन्हीही पॅनलला बराबरीत बारी झाली असून, आता उपसरपंच पद पूर्णपणे अपक्ष उमेदवारांवर आले आहे, अपक्ष उमेदवार ज्या बाजूला झुकतील त्या बाजूचा उपसरपंच होईल अशा स्वरूपाची चर्चा आता गावात जोर धरू लागली आहे,