सुनील भंडारे पाटील
बऱ्याच दिवसांपासून पेरणे फाटा येथील जिल्हा परिषद शाळा वाघमारे वस्ती येथे शाळेत मोठ्या प्रमाणात सोई,सुविधांचा अभाव पाहिला मिळाला असून शाळेमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांना मिळत नसलेल्या सुविधांची पाहणी करून माहिती आम्ही जाणून घेतली असून यापुढील कालावधीत आम्ही पेरणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांना बरोबर घेऊन या पेरणे फाट्यावरील जिल्हा परिषद शाळेच्या सर्वच विविध भौतिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.तसेच ही आदर्श शाळा बनविण्यासाठी यापुढे प्रयत्न करणार असल्याचे पेरणे गावच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच उषा दशरथ वाळके यांनी या शाळेला आश्वासन देताना सांगितले.
पुणे-नगर महामार्गावरील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पेरणे फाटा(ता.हवेली) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमारे वस्ती या शाळेच्या वतीने नुकत्याच बहुमतांनी विजयी होऊन निवड झालेल्या पेरणे ग्रामपंचायतीच्या सरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार पार पडला.यावेळी आवर्जून जिल्हा परिषद शाळेमध्ये मिळत नसलेल्या विविध सोई,सुविधा,कामांचा आढावा पेरणे गावच्या नवनिर्वाचित सरपंच उषा दशरथ वाळके यांच्या सह ग्रामपंचायत सदस्या मंगल वामने,ग्रामपंचायत सदस्य दिनेश वाळके,ग्रामपंचायत सदस्य दिपक वाघमारे यांच्यासह ग्रामपंचायतीचे माजी सदस्य साईनाथ वाळके, पेरणे तंटामुक्त समितीचे माजी उपाध्यक्ष तथा पेरणेच्या सरपंच यांचे पती दशरथ वाळके,धनंजय जमादार,जनार्दन गायकवाड यांनी मिळून घेतला.
याप्रसंगी पेरणेच्या नवनिर्वाचित सरपंच उषा दशरथ वाळके,ग्रामपंचायत सदस्या मंगल वामने,ग्रामपंचायत सदस्य दिनेश वाळके,ग्रामपंचायत सदस्य दिपक वाघमारे यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांचा सत्कार जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका भारती चव्हाण यांच्यासह शिक्षकांच्या हस्ते पार पडला.यावेळी शाळेच्या शिक्षिका विजया सातपुते,कुंदा शिंदे,वाल्मीक टुले,उषा नलावडे,वंदना बोरसे,ज्ञानेश्वर गायकवाड,दिक्षा गुंदेचा, मिनाक्षी धामणे,भोर आदीशिक्षक,विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेच्या समोरील मैदानात परिसरात माती टाकने,शाळेचा वीज मीटर जोडून मिळणे,गावचा पाणीपुरवठा नळ योजना जोडून देणे,दोन वर्ग खोल्यांमध्ये वाटर प्रुफ करणे,शौचालायास कामगार मिळणे,चार जुन्या वर्ग खोल्या पाडून नवीन स्लॅबच्या खोल्या बांधून मिळणे,शाळेच्या व्यासपीठावर सभामंडप शेड बसवून देणे अशा भौतिक सुविधा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक भारती चव्हाण यांनी उपस्थित मान्यवर यांच्याकडे केली असून उपस्थित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी कामे पूर्ण करून देण्याचे आश्वासन शाळेला दिले आहे.