सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा, वढु बुद्रुक (तालुका शिरूर) आणि परिसरातील गावांमधील ऊस उत्पादक शेतकरीची सद्यस्थितीत संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून हेळसांड होत असून ऊसतोड टोळ्या नसल्याने शेतकऱ्यांची होत आहे परवड,
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षांपूर्वी कायदेशीर कारवाईतून शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील काही गावे कारखान्याच्या गटाला जोडली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सभासद देखील करून घेतले आहे, सभासद असणाऱ्या शेतकऱ्याची नोंद असताना, परिसरातील गावांमध्ये ऊसतोड टोळ्या नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होऊ लागले आहेत, या गावांमध्ये एकच हार्वेस्टर असून हे हार्वेस्टर अडचणीच्या प्लॉटमध्ये पोहोचत नाही, मागील वर्षी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला गेलेला ऊस, तसेच नवीन नोंदी असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला ऊसतोड टोळ्यांची नितांत गरज असताना कारखान्याकडून मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे, ऊस तोडणी वाचून चाललेला असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे, त्यामुळे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याने या भागात ऊसतोड टोळ्या जास्त टाकाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे,
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे कृषी अधिकारी राजेंद्र वनवे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही,
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे प्रतिनिधी संतोष लोखंडे यांनी सांगितले की, ऊसतोड टोळ्यांची संख्या कमी आहे, नोंद असलेला पाऊस हार्वेस्टर मशीनच्या सहाय्याने तोडत आहोत,