सुनील भंडारे पाटील
वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथे विश्राम धाम आणि माहेर संस्थेच्या जवळ दिनांक 22/12/2022 रोजी सायंकाळी आत्ता 8:30 वाजता बिबट्याचे दर्शन झाले,
गेल्या अनेक दिवसांपासून वढू बुद्रुक, आपटी, वाजेवाडी या गावांमध्ये बिबट्याचे अस्तित्व असल्याचे, तसेच शेतामध्ये बिबट्याच्या पायाचे ठसे आढळत आहेत, सर्रासपणे वाड्यावर पाळीव कुत्री बिबट्याच्या भक्षस्थानी पडत आहेत, आज रात्री 8:30 वाजता भरारी संपादक सुनील भंडारे पाटील ऑफिस वरून घरी जाताना, तसेच गावाकडून मलाव वस्तीवरील पोपट मलाव गावाकडून घरी जात असताना, माहेर संस्था आणि विश्राम धाम यामधील अंतरामध्ये आल्हाट यांच्या घराकडून बिबट्या रस्त्याच्या वरील बाजूस असणाऱ्या गोरख अरगडे यांच्या उसात घुसला आणि कमळीचा मळ्याकडे गेला, हे प्रत्यक्ष दर्शनी निदर्शनास आले, त्यामुळे वढू बुद्रुक वाड्या वस्तीवरील शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी, तसेच शिरूर वनक्षेत्र विभागाने तातडीने या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी केली आहे,