लोणीकाळभोर, कदमवाकवस्ती येथे भिषण अपघात

Bharari News
0
लोणी काळभोर चंद्रकांत दूंडे 
      पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत एचपी गेट नंबर ३ च्या समोर ट्रक व चारचाकी गाडी यांच्यात भीषण अपघात झाला आहे. हा अपघात शनिवारी (ता. २४) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झाला आहे.
   या अपघातात चारचाकी गाडीने पाठीमागून मालवाहू ट्रकला जोरदार धडक दिल्याने गाडीतील चौघे अडकले होते लोणी काळभोर पोलिसांसह वाहतूक विभागाचे पोलीस,सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी कटरच्या सहाय्याने गाडी मधील अडकलेल्या चौघांना बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न केले व पुढील उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीची नावे समजू शकली नाहीत.मिळालेल्या माहितीनुसार, पुणे -सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत एचपी गेट नंबर ३ च्या समोर चारचाकी गाडीतून चौघे सोलापूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी चारचाकी गाडीच्या पुढे असलेल्या मालवाहू ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागे असलेल्या चारचाकी चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटचारचाकी गाडी ही थेट ट्रकच्या खाली घुसली.   
स्थानिक नागरीक व लोणी काळभोर पोलीस चारचाकी गाडीत अडकलेल्या चौघांना काढण्याचे शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. यावेळी लोणी काळभोर पोलीस व लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस तसेच ग्रामस्थ  आदींनी  त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. पुणे सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली होती अपघात झालेल्या ठिकाणी बघ्यांनी गर्दी केल्यामुळे काही काळ मोठ्या प्रमाणात वाहतुक विस्कळीत होऊन दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, पुणे सोलापूर महामार्गावर व सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात टँकर लावले जातात. याठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब ठरली आहे. त्यामुळे अपघातात वाढ होत आहे. तरी या ठिकाणी रेल्वे स्थानक इंग्रजी माध्यमाच्या शाळा, एमआयटी काॅलेज, हॉस्पिटल यांची संख्या मोठी असल्याने  या ठिकाणचे रस्ते गर्दीने गजबजलेले असतात.या ठिकाणी उड्डाण पुलाची आवश्यकता असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. लोणी काळभोर शहर पोलिसांनी या ठिकाणी लागणाऱ्या टँकरवर व रिक्षावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!