आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
आळंदीच्या प्रतिष्ठित तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेते कार्यकर्त्यांनी एकत्रित येत आळंदी पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले होते या निवेदनामध्ये सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक वर मर्यादा तसेच आळंदीतील विविध रस्त्यांवर बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या गाड्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती, त्या अनुषंगाने आळंदी पोलीस ट्राफिक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी त्यांच्या स्टाफ सोबत आज मोठी धडक कारवाई केली,
कोणाचाही मुलाहिजा न बाळगता सरसकट दंडात्मक कारवाई केली आहे,श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात समोर लागलेल्या दोन चाकी वर नो पार्किंग मध्ये गाड्या लावल्याची सरसकट ई चलन दंड करण्यात आलेला आहे, त्याच बरोबर आळंदीतील व्यापाऱ्यांना याबाबतचे महत्त्वही त्यांनी पटवून देत सहकार्याची विनंती केलेली आहे, रस्त्यांवर कुठल्याही प्रकारचे अडथळा होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची अन्यथा मोठ्या प्रमाणात मी कारवाई करणार आहे, अशा सूचनाही सर्व व्यापाऱ्यांना त्यांनी यादरम्यान दिल्या, त्यांच्यासोबत सुमारे सहा ते सात ट्रॅफिक पोलीस, ई चलन स्वयंचलित यंत्र,एक पोलीस व्हॅन, या सह पायी रस्त्याने फिरत बेशिस्त वाहनांवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी कारवाई केलेली आहे, त्याचबरोबर नगरपालिका चौकातील रिक्षा स्टँडवर असलेल्या सर्व रिक्षांवर सरसकट दंडात्मक कारवाई त्यांनी केली, याबाबत बोलताना बेशिस्त पणे रस्त्यात अडथळा होईल असे वाहन पार्क करणे, रिक्षा बॅच बिल्ला नसणे, लायसन्स नसणे,या व इतर सर्वच बाबतीत कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले, पुढील काळामध्ये होणारी कारवाई मोठी असेल याही सूचना त्यांनी या माध्यमातून दिलेले आहेत