प्रतिनिधी: विनायक साबळे
पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्यानंतर अनेक धडाकेबाज कारवाया करत गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी १०५ मोक्का अंतर्गत, ८२ एमपीडीए अंतर्गत कारवाया केल्या आहेत.
तसेच दर महिन्याच्या क्राईम मिटींग मध्ये गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कारवाईचा आढावा घेऊन त्यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल बहिर्जी नाईक, विशेष कामगिरी पुरस्कार, युनिट ऑफ द मंथ यांसारखे पुरस्कार देऊन त्यांचे मनोबल देखील वाढवले.
त्याचाच एक भाग म्हणून यंदा पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांनी गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे आयोजित केलेल्या शतकोत्तर रौप्य महोत्सव निमित्त आयोजित गुरु महात्म्य पुरस्कार वितरण व संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमामध्ये पुणे शहर पोलीस दलातील एकूण ०८ बहिर्जी नाईक पुरस्कार प्राप्त पोलीस अंमलदार, तसेच विविध शाखांमधील उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांपैकी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, पोलीस नाईक नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले यांना संदीप कर्णिक(सह पोलीस आयुक्त, पुणे शहर) यांचे हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.