चाकण शिक्रापूर मार्गावर साबळेवाडी घाटात खड्डेच खड्डे

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
      चाकण ते शिक्रापूर या महत्त्वाच्या रस्त्याच्या मार्गावर साबळेवाडी (तालुका खेड) येथे घाटात मोठमोठे खड्डे पडले आहेत ,त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे, खड्डे वाचवण्यात होत आहेत लहान-मोठे अपघात,   
शिक्रापूर वरून चाकण ला जाणारा हा महत्त्वाचा रस्ता पुढे तळेगाव दाभाडे मार्गे जुना मुंबई पुणे रस्ता, तसेच नवीन पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे ला जोडला जात असून दरम्यान चाकण मध्ये नाशिक महामार्ग जोडला जात आहे, त्यामुळे हा मार्ग महत्त्वाचा असून, शेती क्षेत्र, आसपासचे औद्योगीकरण, रहदारी, शहरीकरण यामुळे वाहतुकीची सतत वर्दळ असते, या मार्गावर आत्तापर्यंतच्या काळात साबळेवाडी घाटमाथ्यावर, तीव्र स्वरूपाची वळणे, यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडलेले आहेत, त्यात आता वाहतुकीमध्ये अडथळा आणणारे नवीन संकट म्हणजे रस्त्यात मध्यंतरी मोठमोठे खड्डे पडले आहेत, की ज्या खड्ड्यांमधून मालवाहतूक मोठ्या गाड्या, तसेच दुचाकी देखील उतरून पास होऊ शकत नाही, एवढे मोठे खड्डे तयार झाले आहेत, लहान मोठी वाहने प्रवास करताना खड्डे वाचवताना नागमोडी वाहने चालवत आहेत, परिणामतः लहान मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे, संबंधित खात्याचे मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, या घाटामधील रस्तावरील खड्डे तातडीने बुजवावे अशी मागणी प्रवासी व नागरिक वारंवार करत आहेत,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!