सुनील भंडारे पाटील
शिक्रापूर (तालुका शिरूर) ते चाकण या महत्त्वाच्या रस्त्यावर वाढती वाहतुकीची कोंडी, सतत होणारे अपघात, यामुळे लोकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रस्त्याच्या मधोमध पूर्णपणे दुभाजक, तसेच रस्ता सहा पदरी होण्याची गरज,
संबंधित रस्त्यावर शिक्रापूर पासून पुढे वाजेवाडी चौफुला, चाकण, पुणे नाशिक महामार्ग, तसेच पुढे तळेगाव दाभाडे मार्गे, जुना पुणे मुंबई महामार्ग तसेच पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग ला जोडणारा महत्त्वाचा हा रस्ता असून परिसरातील वाढते औद्योगीकरण, शहरीकरण, रहदारी, मोठे बागायत शेतीक्षेत्र, या संदर्भातील वाहतूक, तसेच प्रवासी वाहतूक, यामुळे शिक्रापूर चाकण रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते, रस्त्याच्या मध्यभागी रस्ता दुभाजक नसल्यामुळे वाहन चालक आपला रस्ता ट्रॅक सोडून, विरुद्ध दिशेच्या ट्रॅकवर, पुढे चाललेली वाहने ओव्हरटेक करत विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांच्या अंगावर जात, असुरक्षित वाहने चालवत असल्याने मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे, संबंधित रस्त्यावर आतापर्यंत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत अनेक अपघात घडलेले आहेत, शिवाय अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, असे अपघात लोकांना अजून किती दिवस पहावे लागणार, शिक्रापूर चाकण रस्त्या विषयी संबंधित खात्याने तातडीने निर्णय घेऊन या पूर्ण अंतरात रस्ता दुभाजक टाकून, रस्ता सहा पदरी करावा अशी मागणी नागरिक करत आहेत,