दहिवडी प्रतिनिधी
दहिवडी (तालुका शिरूर) येथील युवकाची वारजे पुणे येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत 86 किलो गटांमध्ये पुणे जिल्ह्याकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे, कुलदीप संतोष इंगळे या युवकाची पुणे जिल्ह्यातून 86 किलो गटांमध्ये वारजे येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठून विजय निश्चित केला व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून महाराष्ट्र स्पर्धेसाठी पात्र ठरल्याचे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने जाहीर केले.या निवडीनंतर त्याचे दहिवडी परिसर व पंचक्रोशितून अभिनंदनचा वर्षाव होत आहे या निवडीनंतर त्याचे दहिवडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यामध्ये संतोष इंगळे चंद्र बापू उकले, प्रवीण उकले, माऊली उकलेमा सरपंच संतोष दौंडकर उपसरपंच सचिनदादा गारगोटे,आनंदराव गारगोटे या सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच त्याला मार्गदर्शक म्हणून कुलदीप यांचे वडील संतोष इंगळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच कुलदीप ने माझी महाराष्ट्र केसरी साठी निवड झाल्यानंतर माझे स्वप्न पूर्ण झाल्याचे त्यांने सांगितले.