सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात मावळ भागात, सह्याद्रीच्या कुशीत असलेले भाविकांचे जागृत श्रद्धास्थान खारवडे (तालुका मुळशी जिल्हा पुणे) गावातील श्री म्हसोबा देवस्थानामध्ये रविवारी भाविकांनी रांगेतदर्शन घेतले,
पुरातन काळापासून सह्याद्री पर्वताच्या रांगेत अप्रतिम निसर्ग सौंदर्य मध्ये दगडामध्ये रेखीव बांधकाम व परिसर भाविक भक्तांचे मनमोहीत करीत आहे, खारवडे येथील श्री म्हसोबा देव म्हणजे भाविक भक्तांचे जागृत देवस्थान, राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण या ठिकाणी येत असतात, मनातील इच्छा, प्रार्थना बोलल्यानंतर पूर्ण होतात अशी भाविकांची मनोभावे श्रद्धा आहे, असंख्य लोकांना मनामधील इच्छा देखील पूर्ण झाल्याचे लोकांनी सांगितले, त्यामुळे या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे, पुणे जिल्ह्यातील अनेक भागातील लोक या ठिकाणी येतात, आठवडाभर तर गर्दीत असतेच, परंतु रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने, भाविकांची गर्दी दाट असते, गर्दी जरी असली तरी, लोकं शिस्तीत रांगेत उभे राहून भक्त दर्शन घेत आहेत, श्री म्हसोबा महाराज देवस्थान ट्रस्ट च्या माध्यमातून भक्तांसाठी सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत,
लहान, थोर, अबाल, वृद्ध,महिला, रांगेत उभे राहून शांततेत, मनोभावे देवाचे दर्शन घेताना दिसत आहेत, भाविकांसाठी सभामंडप, दर्शन बारी मंडप, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पार्किंग व्यवस्था, बगीचा,पूजेचे ताट, व इतर अनेक सोयी सुविधा श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने शिस्तबद्ध पद्धतीने देण्यात आलेले आहेत, मंदिराचा परिसर आणि मंदिरात प्रवेश केला की मन प्रसन्न होते,