आळंदी पोलिसांची कामगिरी इलेक्ट्रॉनिक पंप चोरणाऱ्या टोळीस अटक

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
         आळंदी पोलीस गुन्हे तपास विभागातील पोलीस हवालदार लोणकर पोलीस नाईक सानप पोलीस कॉन्स्टेबल गरजे हे पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी सहाच्या सुमारास दिनांक 13 12 2022 रोजी चऱ्होली खुर्द परिसरामध्ये हॉटेल सावलीच्या समोर स्कूटी एम एच १४ ,१९२७ या त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल एक्सेस स्कुटी वरून सावली हॉटेल समोरील बाजूस गोणीमध्ये काहीतरी संशयितरित्या घेऊन जात असताना दिसले,
त्यांचा पाठलाग करून इंद्रायणी नदीवर चऱ्होलि खुर्द हद्दीत त्यांना अडवण्यात आले,अधिक तपास करता चौकशी केली असता उडवा उडवी ची उत्तरे देत असल्याचे आढळले याप्रकरणी निखिल अरुण पगडे  वय,२१ रा,चऱ्होली,खुर्द दुसरा आरोपी अफजल इस्लाम खान रा,२१ प्रतापगड ,उत्तर प्रदेश सध्या रा चऱ्होली, यांना या दोघांना चौकशी करता आळंदी पोलीस स्टेशन येथे आणले असता त्यांनी दिनांक 11 12 2022 रोजी रात्रीच्या सुमारास एक वाजता चऱ्होलि नदीपात्रातून मोटर पंप चोरल्याचे सांगितले तसेच सदरील चोरीचे इलेक्ट्रॉनिक मोटर पंप चऱ्होली खुर्द येथील आसिफ आकील  खान  नावाच्या व्यक्तीस विकल्याचे कबूल केले आहे, गुन्हा रजिस्टर 359 गुन्हा रजिस्टर 369 नोंदणी सदर आळंदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद असल्याचे तपास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले त्यावरून सुमारे आठ मोटर पंप चोरल्याची कबुली आरोपींनी दिली आहे सुमारे दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीचा छडा लावण्याचा आळंदी पोलीस स्टेशनला यश आलेले आहे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचना प्रमाणे घरपोडी चोरीच्या शोध मोहिमेअंतर्गत सदर कारवाईला यश मिळाले आहे आळंदी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आर यम जोंधळे, पोलिस हवालदार सानप, पोलिस कॉन्स्टेबल लोणकर, खेडकर ,गजरे,आढे , या सर्व पोलीस कॉन्स्टेबल पोलीस नाईक यांनी कारवाई सहभाग घेतला पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनांच्या नुसार सर्व प्रकारच्या चोरींच्या गुणांचा तपास गुन्हे शाखेचे तपास अधिकारी पेट्रोलिंग द्वारे करत असताना सदर गुन्हा उघडकीस आला आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!