सुनिल भंडारे पाटील
दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान , माहिती सेवा समिती व ईथर सहयोगी संस्था यांचे माध्यमातून गेले ६ वर्षापासून बकोरी गायरान डोंगरावर वृक्षारोपण करत आहेत मोठ्या कष्टाने उभी केलेली बकोरी (तालुका हवेली) येथील वनराईचा थोडा भाग जळून खाक झाल्याने चंद्रकांत वारघडे, आणि ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगरच कोसळला,
आज अखेर ३०००० देशी झाडे लावली आहेत व त्याचे वारघडे परिवाराकडून संघोपण चालू आहे गेले ६ वर्षापासून टँकर द्वारे विकत पाणी घेऊन वनराई जगवली आहे डोंगर हीरवागार होताना दिसत आहे
चंद्रकांत वारघडे व त्यांचे कुटुंब त्याठीकानी गेले ६ वर्षापासून नियमित श्रमदान करत आहेत याकामासाठी अनेक दानशूर नागरीक मदतही करत आहे १०० वेगवेगळ्या प्रजातींची झाडे लावली आहेत त्या डोंगरावर भविष्यात ५ लक्ष झाडे लावण्यात येणार असल्याचे धनराज वारघडे यांनी सांगितले त्याठिकाणी दरवर्षी आग लागते म्हणून संपुर्ण झाडांचे आजुबाजूचे गवत कापले जाते नुकतेच संपुर्ण वनराईत १५ पाण्याच्या टाक्या ठेऊन ठीबक सिंचन द्वारे झाडांना पाणी देण्यासाठी व्यवस्था केली आहे परंतु आज सकाळी अचानक कोन्हीतरी त्याठिकाणी आग लावली त्याठीकानी असलेल्या कामगार वामण याने काही नागरीकांचे मदतीने आग आटोक्यात आनली त्यामुळे मोठा अनर्थ ठळला. बकोरी देवराई वनराई प्रकल्प हा एक सुंदर पर्यटनासाठी ठीकान निर्माण झाले आहे परंतु आज काल त्याठीकानी मंदपींचा त्रास वाडु लागला आहे , जुगारी अड्डा, गुन्हेगारी वाढताना दिसत आहे अनेक वेळा लोणिकंद पोलीस स्टेशन मध्ये लेखी तक्रारी दिल्या परंतु पोलीस त्याठीकानी मदत करताना दिवस नाही .रोज रात्री ६ ते ९ यावेळेत पोलिसांनी गस्त घातली तर नक्कीच हे प्रकार कमी होतील असे वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले.