सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यात पूर्व हवेली पट्ट्यातील अनेक गावांमध्ये गुंठेवारी व्यवसायाने जोर धरला असून, आता तर नवीनच फंडा प्लॉटिंग व्यवसायिकांनी गुंठेवारीच्या बाजारात आणला आहे, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे आमिष दाखवून गुंठे खरेदी कडे वळवत आहेत, परंतु हेच आमिष गुंठे खरेदीदाराला खड्ड्यात ओढणार असल्याचे उशिरा लक्षात येते,
गुंठेवारीच्या बाजारामध्ये पूर्व हवेलीपट्ट्यातील आऊटसाईडच्या भागांमध्ये नोटबंदी आणि कोरोना च्या सावटा मुळे प्लॉटिंग व्यावसायिक चांगलेच गारठलेले आहेत, परंतु शहरालगच्या भागांमध्ये केसनंद पासून वाडेबोल्हाई पर्यंतच्या निसर्गरम्य भागात प्लॉटिंग व्यवसायिकांचा सुळसुळाट झाला असून तुकडा बंदी कायद्याचे उल्लंघन करत अगदी हाकेच्या अंतरावर प्लॉटिंग विक्रीचे बोर्ड लागलेले आहेत, सद्यस्थितीत मंदी असलेल्या बाजारात प्लॉट खरेदीसाठी ग्राहकांना वेगवेगळे आमिष दाखवून आकर्षित केले जात आहे, प्लॉट खरेदी केला तर, 1) गुंठा खरेदीवर पंधरा मिनिटांची हेलिकॉप्टर राईड फुकट,2) दहा गुंठ्यांच्या खरेदीवर बुलेट गाडी,3) एक गुंठे च्या खरेदीवर एक्टिवा गाडी,4) एक गुंठेच्या खरेदीवर अष्टविनायक दर्शन,5)0% डाऊन पेमेंट,6)0% व्याजदर, हेलिकॉप्टर राईड मध्ये प्लॉट खरेदी दार हवेत गेला की तो हवेतच राहतो अशा प्रकारच्या योजना राबवून, ग्राहकांना आकर्षित केले जाते, या आमिषाच्या आनंदामध्ये कित्येक ग्राहक बळी पडतात, मग त्या प्लॉट खरेदी मध्ये, कालांतराने एकापेक्षा अनेक व्यवहार निघतात, शिवाय संबंधित प्लॉटवर जुने लिटिगेशन निघते, आणि मग या आमिषाला बळी पडलेल्या प्लॉट खरेदीदाराला शेवट डोक्याला हात लावण्याची वेळ येते, अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे प्लॉट विक्रेत्याच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता ग्राहकाने जागरूकता बाळगणे गरजेचे आहे,