सुनिल भंडारे पाटील
ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची बससेवाबससेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या असून, त्यामुळे ग्रामीण भागातील वाघोली ते राहू आणि वाघोली ते रांजणगाव सांडस बससेवा पूर्ववत होणार असल्याने प्रवाशांना, नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोना काळात ग्रामीण भागात ४० मार्गावर सुरु करण्यात आलेली पीएमपीएमएल बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात ११ तर दुसऱ्या टप्प्यात १२ बस मार्गावरील सेवा बंद करण्यात आल्या होत्या. यामध्ये वाघोली ते राहू-पारगाव व वाघोली ते रांजणगाव सांडस बस सेवा बंद झाल्या होत्या. मात्र, ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नागरिकांच्या समस्येची दखल घेऊन पीएमपीएमएलचे संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना सदर भागातील बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सोयीस्कर होणार आहे.
ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा बंद झाल्याने विद्यार्थी, नोकरदार वर्ग, शेतकरी यांचे मोठे हाल होत होते ही बस सेवा पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी होत होती याबाबत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ विशेष प्रयत्न करत ही बस सेवा पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.. जयेश शिंदे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष