पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या अंतर्गत चांदमल ताराचंद बोरा कॉलेज (शिरुर) या ठिकाणी नुकत्याच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत शिंदोडी येथील कै हरुबाई उमाजी शितोळे विद्यालयातील ८ मुली व ३ मुलांची बारामती येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक सुरेश बांबळे यांनी दिली.
१४ वर्ष रिले प्रथम क्रमांक
१) स्नेहा पवार २) तेजस्विनी वाळुंज,
३) कार्तिकी गायकवाड ४) वैष्णवी खेडकर
जिल्हा निवड (मुली)
१)अदिती वाळुंज, प्रथम क्रमांक (भाला फेक)
२) गायत्री वाळुंज, प्रथम क्रमांक, (३ किमी चालणे)
३) तेजस्विनी वाळुंज प्रथम क्रमांक, (उंच उडी)
४) कार्तिकी गायकवाड, द्वितीय क्रमांक (गोळा फेक)
जिल्हा निवड (मुले)
१) अमोल शिंदे, प्रथम क्रमांक (५ किमी चालणे)
२) रोहन दांगट, द्वितीय क्रमांक, (५ किमी चालणे)
३) चैतन्य भोस, द्वितीय क्रमांक (उंच उडी)
तालुका स्तरीय स्पर्धेत विजयी खेडाळू
१) साक्षी अनुसे, तृतीय क्रमांक (गोळा फेक व उंच उडी)
२) स्नेहा पवार, तृतीय क्रमांक (उंच उडी)
मुलांमध्ये साई काळे, तृतीय क्रमांक (तिहेरी उडी)
या मुलांना शाळेतील क्रीडा शिक्षक गणेश भोस, चंद्रकांत शिंदे, शितल भगत यांनी मार्गदर्शन केले. शिंदोडी ग्रामस्थांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.