सुनील भंडारे पाटील
पुण्याचे अगोदरचे पोलीस आयुक्त अभिनव गुप्ता यांची बदली झाल्यानंतर, नवीन आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली आहेत,
नवीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी 1991 साली आयपीएस ची परीक्षा पास केली त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यातील सांगली येथे पोलीस अधीक्षक म्हणून आपले कर्तव्य बजावले होते, राज्याची राजधानी मुंबई येथे पोलीस दलात त्यांनी काही काळ काम केले, राज्य गुन्हे अन्वेषण विभागात त्यांनी पोलीस महानिरीक्षक म्हणून काम केले आहे, पुण्यातील बिनतारी संदेश विभागात अप्पर पोलीस महासंचालक म्हणून ते नियुक्त होते, आजच्या नियुक्ती अगोदर ते राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख होते, देश पातळीवर त्यांचा केंद्र सरकारकडून गौरवही करण्यात आला, पोलीस खात्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे काम करणारे व्यक्तिमत्व पुणे शहराला लाभलेली आहे, त्यामुळे निश्चितच गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा बसणार असून, नागरिकांच्या अडचणी कमी होणारा आहेत, शिवाय पुणे शहरामध्ये पोलिसांची मदत सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे, पुणे शहराला कर्तव्यदक्ष, अनुभवी अधिकारी मिळाल्याने शहर पोलीस खात्यात भविष्यात बदल देखील होऊ शकतात, आज रितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला,