सुनील भंडारे पाटील
पूर्व हवेली तालुक्यामध्ये पेरणे गाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जनतेतून सरपंच पद निवडीसाठी एका उमेदवाराने चक्क पुढील पाच वर्षात गावामध्ये काय विकास कामे करणार याचा जाहीरनामा नोटराईज करून ग्रामस्थांकडे सुपूर्त केला आहे, सध्या गावामध्ये या जाहीर नाम्याची चर्चा सर्वत्र चालू आहे,
निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपण पाहतो की इच्छुक उमेदवार अनेक प्रकारे प्रचार करून आश्वासने देऊन निवडणुका लढवत असतात परंतु ही आश्वासने भविष्यात तोंडापूर तीच राहतात पेरणे गावातील जनतेमधून सरपंच पदासाठी उभे असलेले महिला उमेदवार यांनी गावातील विकास कामांचा अभ्यास करून एक अनोखा उपक्रम राबवला आशाताई संतोष (नाना) सरडे (एम ए पदवीधर )असे या उमेदवाराचे नाव असून त्यांनी 9 विकास कामांचा जाहीरनामा नोटराईज करून चक्क ग्रामस्थांकडे सुपूर्द केला,
ही नऊ महत्त्वाची विकास कामे करून देण्याचा लेखी वचन दिल्याने गावामध्ये सर्वत्र या उमेदवाराची चर्चा चालू आहे, 1)पेरणे ग्रामपंचायत भ्रष्टाचार मुक्त,2) पारदर्शक कारभार, 3)कोणीही हिशोब विचारा, 4)गाव स्वच्छ सुंदर निरोगी आयएसओ नामांकन कडे वाटचाल, 5)प्रत्येक वार्डामध्ये सिमेंट रस्ते 24 तास शेतीपंपासाठी वीज, शुद्ध पाणीपुरवठा, सर्व हितावह निर्णय, 6) राज्य व केंद्र सरकारचे शेतकरी कामगार महिला नागरिकांसाठी ची योजना अंमलबजावणी, 7)नागरिकांची ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयातील कामे पाठपुरावा, 8)सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर, विद्यार्थी शेतकरी महिला व युवकांसाठी मार्गदर्शन शिबिर, 9)युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देणार, अशा स्वरूपाचे मुद्दे नमूद करून कोणालाही गुलाल व भंडारा न उचलता, कोणालाही जबरदस्तीने न उचलायला लावता कायद्याच्या चौकटीत नोटरी रजिस्टर करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उमेदवार आशाताई सरडे यांनी अनेक ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुपूर्त केला, ना आश्वासन - ना तोंडी शब्द, विकास कामांचा लेखी जाहीरनामा याची चर्चा संपूर्ण गावभर, आगळावेगळा उपक्रम,