सुनील भंडारे पाटील
शिरूर हवेली तालुक्यामध्ये बऱ्याचशा ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याचे निष्पन्न झाले आहे, त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला असणारा शिरूर हवेली तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाची ताकद कमी झाली की काय ? अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे,
शिरूर हवेली तालुक्यामध्ये गेल्या दोन पंचवार्षिक पासून विधानसभेची जागा देखील राष्ट्रवादीचे हातात आहे, तसेच चालू पंचवार्षिक ला लोकसभा देखील राष्ट्रवादीच्या ताब्यात असताना दोन्ही तालुक्यातील बरेचशे ग्रामपंचायती मात्र राष्ट्रवादीच्या हातातून गेलेले आहेत, शिरूर तालुक्यामध्ये एकूण चार ग्रामपंचायती पैकी 1 ग्रामपंचायत भाजपच्या हातात तर 1च ग्रामपंचायत राष्ट्रवादीला मिळाली आहे, इतर दोन ग्रामपंचायतीवर अपक्ष व शिंदे गटाची सत्ता आली आहे, त्यामध्ये मांडवगण फराटा भाजप, सोने सांगवी शिंदे गट, करंजावणे अपक्ष, तर काठापुर या एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीला सत्ता मिळाली आहे, तर हवेली तालुक्यामध्ये पाच ग्रामपंचायती पैकी चार ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता तर एकच ग्रामपंचायत राष्ट्रवादीला मिळाली आहे, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणूकि मध्ये कदमवाक वस्ती, आव्हाळवाडी, पेरणे, बुरकेगाव, या ग्रामपंचायतीवर भाजपने आपला झेंडा फडकवला आहे, तर पिंपरी सांडस ही एक ग्रामपंचायत मिळून राष्ट्रवादीला गप्प बसावे लागले आहे,
एकंदरीत शिरूर हवेली तालुक्यामध्ये तळागाळातील मतदान महत्त्वाचे आहे, या मतदानाचा कौल भावी निवडणुकांचे चित्र स्पष्ट करत आहे, त्यामुळे भविष्यात भारतीय जनता पार्टीला भावी निवडणुकांमध्ये वातावरण अनुकूल दिसत असून इतर पक्षांना मात्र फार मोठा दणका असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे, या मतदारसंघात राष्ट्रवादीचे खासदार आणि आमदार असताना देखील ग्रामपंचायतला एवढे वातावरण फिरते, हा निश्चितच राष्ट्रवादी पक्षाला देखील मोठा झटका आहे,