सुनील भंडारे पाटील
चाकण (तालुका खेड) पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1932 / 2022 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7, 7 अ, व 12,लोकसेवक संतोष सुरेश पंदरकर (पद पोलीस शिपाई - पाईट दूरक्षेत्र चाकण पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय) तसेच खाजगी इसम किसन आंद्रे (पत्ता. पाळू पाईटगाव, तालुका खेड जिल्हा पुणे), यांच्यावर लाच मागणी प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे,
याबाबत चाकण पोलीस स्टेशन येथे पोक्सो कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी यातील तक्रारदार यांच्याकडे पंदरकर यांनी दहा हजार रुपये लाच मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे प्राप्त झाली होती, सदर तक्रारीच्या पडताळणीनंतर पंदरकर, व खाजगी इसम आंद्रे यानी १० हजार रुपयांची लाचेची मागणी केली असल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे, पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करत आहेत,
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने केली,