सुनिल भंडारे पाटील
बकोरी (ता हवेली) देवराई वनराई प्रकल्पामध्ये दरवर्षी प्रतेक सनाला वृक्षारोपण करुण सन साजरा केला जातो त्यामध्ये दसरा सनाला आपटा, श्रावण महीन्यात बेल ,वटपोर्णिमेला वड, गणेश चतुर्थीला केवडा,पारीजातक, जासवंद,दत्तजयंती औंदुबर (उंबर) अशाप्रकारे दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते त्याप्रमाणे आज दत्तजयंती असल्याने सर्व नागरीक दत्त महाराज यांचे बरोबर औंदुबर (उंबर) या झाडाची पुजा करत असतात त्यामुळे आज बकोरी देवराई वनराई प्रकल्पात २१ ऊंबराची झाडे लावली व मागील वर्षी लावलेल्या झाडाचे विधिवत पूजा केली.
झाड हेच आपले दैवत माणून दरवर्षी अशाप्रकारे प्रत्येक सणाला झाडे लावत असतो सदर कार्यक्रमासाठी उद्योजक नानासाहेब जाधवराव, पिंटु कटके, नितीन कंद, हवेली अध्यक्ष कमलेश बहीरट, दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान चे अध्यक्ष धनराज वारघडे, माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, गणेश जाधव, प्रकाश नागरवाड ईत्यादी वृक्षप्रेमी उपस्थित होते. नागरीकांना आव्हान करत असतो मोठ्याप्रमाणात नागरीकांचा प्रतिसाद मिळत असतो अशाप्रकारे हजारो झाडे लागली गेली आहेत त्यामुळे आम्ही नागरीकांना झाडे लावण्यासाठी केलेली विनंती माणली जाते व वृक्षारोपण होते याचे खूप समाधान वाटते. यापुढे खर्या अर्थाने जर पर्यावरण संरक्षण केले नाही तर पुढचे पिडीला खुप यातना भोगाव्या लागणार आहे त्यामुळे प्रतेकाने वाढदिवस, सन साजरा करत असताना झाडे लावावी .असे चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले,