रांजणगाव गणपती प्रतिनिधी
खुन झालेल्या गुन्ह्याचे कसलेही धागेदोरे हाती नसताना रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी आरोपींना अवघ्या १२ तासांच्या आत पकडण्यात यश आले.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये एका ठिकाणी आरोपींनी मयत इसमाला दारु पाजून त्याच्या बँक खात्यातील पैसे स्वतःच्या खात्यावर घेऊन पोबारा केला होता.सदर घटना रांजणगाव एमआयडीसी पोलीसांना समजताच पोलीसांनी पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार घटना स्थळी धाव घेतली असता मयत इसामाचा चेहरा दगडाने ठेचुन टाकण्यात आला होता. त्यामुळे पोलीसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला व तपासासाठी मयताचा फोटो व वर्णनाची शोध पञिका सोशल मिडीयावर व्हायरल केली. असता सदर व्यक्ती प्रशांता मायाधर साहु (वय २९) बिंधानिमा ता. तिगिरीया, जि.कटक , ओरिसा येथील असल्याचे निष्पन्न होताच तपासाची सुञे फिरवत मयत व्यक्ती कोणाच्या संर्पकात होती याची माहिती घेतली आसता प्रदीप कैलास बिडगे ( वय २२) व भागवत रंगनाथ पिडगे ( वय २३) दोघे ही रा. आडगाव सुगाव , ता. पुर्णा , जि. परभणी हे दोघे मयताच्या संर्पकात असल्याचे समजताच संशयित म्हणुन त्यांना ताब्यात घेण्यासाठी संर्पक केला असता ते पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजताच त्यांना पाठलाग करुन ताब्यात घेतले असता पोलीसी हिसका दाखवताच त्यांनी गुन्हा कबुल केला.
आरोपीकडे तपास केला असता प्रदीप पिडगे हा वेरीझे या सँलरी फायनान्स कंपनीचे आँनलाईन कर्ज काढून देण्याचे काम करतो. त्याने मयत प्रशांता साहू यास देखील १, ३४,०००/- रुपये कर्ज काढून दिले होते. या आरोपींनी साहु यास दारु पाजून दगडाने ठेचून ठार मारले व त्याचा मोबाईल घेऊन त्याच्या खात्यावरुन स्वतःच्या बँक खात्यावर पैसे वर्ग केले.
पोलीस अधीक्षक अंकित यादव अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे , उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे , पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे , दत्तात्रय शिंदे ,विलास आंबेकर , विजय शिंदे ,उमेश कुतवळ , वैभव मोरे , संतोष औटी , विजय सर्जीने यांनी केली आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे हे करत आहेत.