सुनिल भंडारे पाटील
वनवासात सितेला हरणाच्या सोनेरी कातड्याचा मोह झाल्याने लंकेत अशोकवनात जावून विरह केश दुखाःकीत जिवन भोगावं लागलं , म्हणून मुलींनी कोणत्याही लोभाला, मोहाला, प्रलोभनाला बळी पडू नये व जिवनातील लक्ष्मणरेषा ओलांडू नये , असे प्रतिपादन पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले यांनी पारगाव ता . आंबेगाव येथील श्री संगमेश्वर माध्य. व कै . बाबुराव गेणूजी ढोबळे उच्च माध्य. कला, वाणिज्य व विज्ञान विद्यालय आणी दतात्रय वळसे पाटील उच्च माध्यमिक विचालयात हजारावर विद्यार्थ्यांना शिक्षणाआधी संस्काराची गरज विषयावर बोलताना केले . लहान मुलींना चाकलेटची, मोठ्या मुलींना गिफ्ट मोबाईलची, लग्नाची अमिषे दाखवून फसवलं गेल्याच्या बातम्या पहाता नवपिढीला संस्काराची गरज असून अशा दुर्घटना टाळाव्यात . पाश्चात्य संस्कृतीचं फॅशनच्या नावाखाली अंधानुकरण नको . त्या सैराट पिक्चरमध्ये दिग्दर्शकाला उच्चनिच, जातीपाती, भेदभाव नको असा संदेश द्यायचा होता पण तरुणाईनं नुसतं गाण्याच्या तालावर नाचत वेगळाच आदर्श घेवून करमाळ्या नजीकच्या दिडशेवर मुली सैराट होत पळाल्या, अन महिनाभरात बरबाद - बदनाम होऊन पार्सले परत वापस आली पण त्यांना घरात घेतलं नाही .कारण एकदा बदनाम झालेल्या मुलीला समाज स्विकारत नाही . म्हणून आपल्या जन्मदात्या बापाला मान खाली घालावी लागेल असे वर्तन आयुष्यात नसावे, असे प्रखर विचार मिडगुले यांनी मांडले . प्राचार्य शत्रुघ्न थोरात यांनी स्वागत व पर्यवेक्षक येलभर व सचिन वागचौरे यांनी हभप मिडगुले यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला . यावेळी ज्ञानयोग सुगंधालयातर्फे अध्यात्माची आवड असणाऱ्या मुलांना हरीपाठ देणेत आले .