सणसवाडी - प्रतिनिधी
चिंचोली मोराची (ता. शिरुर) येथे दत्त जंयती गायरानातील जागा साफ करण्याच्या कारणावरुन एक जणास मारहाण करण्यात आली असुन या बाबत पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या बाबत संतोष दादाभाऊ उकीर्डे वय ३२ वर्ष रा. चिंचोली मोराची, उकिर्डे मळा ता. शिरूर जिल्हा पुणे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ६ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी संतोष उकिर्डे व त्यांचे वस्तीतील वृक्षमित्र मुले गायरानातील जागा दत्त जयंती निमित्त साफसफाई करत असताना चिंचोली गावातील गोविंद रखमा नाणेकर , कैलास सोपान नानेकर , मच्छिंद्र सोपान नानेकर ,गोरख रखमा नाणेकर, नवनाथ रखमा नानेकर यांनी मिळून संतोष यास हाताने मारहाण करून डाव्या हाताच्या करंगळी शेजारील बोट पिरगळून मोडले आहे. तसेच सदरची भांडणे सोडविण्यासाठी आलेले महादेव शिवराम उकिर्डे यांना गोरख रखमा नाणेकर याने हातात दगड घेऊन त्याच्या पाठीत मारहाण केली. त्यावेळी महादेव उकिर्डे यांची पत्नी रुपाली या भांडण सोडवण्यासाठी आली असता हे सर्व जण पळून गेले त्यानंतर फिर्यादी उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल झाले. सदर आरोपींवर भादवि. कलम ३२४, ३२५, १४३, १४७, १४९, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पन्हाळकर हे करीत आहे.चिचोंली गावात गेली दोन वर्षापासून नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशन व ग्रामपंचायत मार्फत वृक्षलागवड व संवर्धन केले जात असून, गावातील दुष्काळी परिस्थिती, बंद पडलेले पर्यटन व पाणी व्यवस्थापण बाबत काम केले जात आहे. त्यामुळे अनेकदा गावगुंड मंडळी कडून कार्यकर्त्यांना नाहक त्रास दिला जात आहे.असे फाऊंडेशनचे अध्यक्षा अक्षताताई उकिरडे यांनी सांगीतले.