लाखो भाविकांनी घेतले आळंदीत माऊलींचे दर्शन

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी आरिफभाई शेख
      सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षात नवीन संकल्प, नवीन आशा, नवीन उमेद घेऊन, लाखोंच्या संख्येने भाविकांनी माऊलींच्या पायरीवर नतमस्तक होतात आळंदीत दर्शन घेतले . आज एक जानेवारी 2023 वर्षाची नवीन सुरुवात, आणि रविवारचा सुट्टीचा दिवस यामुळे माऊली दर्शनाने करत, केलेल्या सर्व चुकांची क्षमा,आणि येणाऱ्या वर्षात सुख, समृद्धी, लाभो, यश लाभो, आरोग्य लाभो,यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी माऊलीच्या आळंदी मंदीरात झाली,   
   माऊलींच्या मंदिरातील चार मजली दर्शन बारी संपूर्ण भरून,अजानबागाच्या जवळची दर्शन बारी ही भरलेली दिसली, कुटुंबासमवेत लाखोंच्या संख्येने भाविक नतमस्तक होताना दिसले, सरत्या वर्षात आलेलं दुःख,येणाऱ्या वर्षात आनंद म्हणून मिळो, अशी भावना व्यक्त करत एकतीस डिसेंबरच्या रात्रीही मंदिर परिसर गजबजलेल्या दिसला याबाबत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी मंदिर व्यवस्थापन बाबत घेत असलेल्या काळजीची माहिती दिली आहे तसेच कुटुंब समवेत आपला व्याप व्यवसाय सोडून रमलेले भाविक आनंद घेताना दिसले माऊलींच्या मंदिरात नतमस्तक होताना एक वेगळा उत्साह वेगळा आनंद चेहऱ्यावर पाहायला मिळाला नवीन वर्ष सुखाचा समृद्धीचे जावो आनंदाचे भरभराटीचे जावो माऊली चरणी प्रार्थना करत एकमेकाला आनंदित होताना पाहून, कुटुंबाचा उत्साह मनाला आनंद देणारा मंदिरात दिसत होता, चैतन्य, उत्साह भक्तिमय वातावरण आणि माऊलींच्या भक्तीत लीन झालेले भाविक डोळे मिटून दर्शन घेताना साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगाचा अनुभव घेताना दिसले,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!