सुनील भंडारे पाटील
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ वढू बुद्रुक (तालुका शिरूर), तुळापूर (तालुका हवेली) येथे लाखो शंभू भक्तांनी समाधीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली होती,
धर्मवीरपीठ, शक्तिपीठ, बलिदान पीठ, दुसरी धर्मपंढरी समजल्या जाणाऱ्या वढू बुद्रुक आणि तुळापूर या ठिकाणी आज इंग्रजी नवीन वर्ष तसेच रविवारची सुट्टी चे औचित्य साधून लाखोच्या संख्येने येऊन शंभू भक्तांनी समाधीचे रांगेत शिस्तीत दर्शन घेतले, शासन तसेच प्रशासनाच्या वतीने चांगल्या सोयी सुविधा देण्यात आलेल्या होत्या,
सोयी सुविधांमध्ये समाधीस्थळावर शांततेत दर्शन घेण्यासाठी रांगेत दर्शन बारीचे नियोजन करण्यात आले होते, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, त्याचप्रमाणे पार्किंगची सोय करण्यात आली होती, कोरेगाव भीमा ते श्रीक्षेत्र वढु बुद्रुक या मार्गावर प्रवास करण्यासाठी पुणे पिंपरी चिंचवड परिवहन महामंडळाच्या वतीने मोफत बस सेवा ठेवण्यात आलेली होती, पोलीस खात्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक, श्रीक्षेत्र तुळापूर या ठिकाणी शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या चांगल्या सोयी सुविधांमुळे लोकांनी समाधान व्यक्त केले,