सुनील भंडारे पाटील
पेरणे फाटा (तालुका हवेली) येथील 1 जानेवारी जयस्तंभ मानवंदनेच्या पार्श्वभूमीवर पुणे नगर रस्ता दुभाजकावर सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेली झाडे, पाण्याअभावी जळू लागली असून, झाडाच्या खोडांमध्ये दारूच्या बाटल्या पहावयास मिळत आहेत,
नुकत्याच पार पडलेल्या कोरेगाव भीमा, पेरणे फाटा येथील विजय रणस्तंभ्याचा कार्यक्रम नुकताच 1 जानेवारीला पंधरा दिवसांपूर्वी पार पडला, लाखोंच्या संख्येने या ठिकाणी मानवंदना देण्यात आली, या कार्यक्रमासाठी शासनाच्या वतीने जय्यत तयारी केलेली होती, मोठी गर्दी असून देखील अतिशय शांततेच्या मार्गाने कार्यक्रम पार पडला, परंतु पेरणे फाट्यावरील पुणे नगर महामार्ग दुभाजकामध्ये सुशोभीकरणासाठी झाडे लावण्यात आलेली आहेत, सद्यस्थितीत या झाडांची अतिशय दयनीय अवस्था असून, 25% झाडे पाण्या वाचून जळाली आहेत, तर उर्वरित झाडे सुकली आहेत, या झाडांच्या खोडाशी मात्र दारूच्या बाटल्या पडलेल्या या ठिकाण दिसत आहेत,