आळंदीतील हिंदू धर्माचे ख्रिश्चन धर्मात परिवर्तनाचे उमटले तीव्र पडसाद =विश्व हिंदू जनगर्जना मोर्चा चे आयोजन

Bharari News
0
आळंदी आरीफभाई शेख
      आळंदीत काही दिवसांपूर्वी ख्रिश्चन महिला धर्मगुरूंनी बायबलच्या निर्देशाप्रमाणे एका कुटुंबाला फळाचा लाल रस येशूचा रक्त समजून आणि काही फळाचे तुकडे हे मास समजून धर्मांतरासाठी असलेल्या कृतीच अवलोकन केलं.    
हिंदू धर्माचा द्वेष दाखवत हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्मात येण्याचा आमिष एका कुटुंबाला दाखवून धर्मांतर केले आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात तीव्र ना पसंती व्यक्त होत.हिंदू धर्मावर आक्रमण झाल्याचा भावना समाजात दिसुनआली.या कृती चे आळंदी आणि पंचक्रोशी हिंदू धर्मिय समाजामध्ये तीव्र पडसाद उमटले.आळंदीत विश्व हिंदू जनगर्जना मोर्चाचे  त्या निमित्तने आयोजन करण्यात आले होते. एक दिवस धर्म रक्षणासाठी उद्दिष्ट आनुसारन करत सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. धर्मांतर बंदी कायदा झालाच पाहिजे, जय श्रीराम ,हिंदू धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता की जय. आळंदीचे पवित्र राखा, धर्मांतर बंदी कायदा झालाच पाहिजे. लव जिहाद कायदा झालाच पाहिजे अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमला, मुळात आळंदी सर्वधर्म समभावासाठी, माऊलींच्या वैष्णव मेळव्यासाठी ओळखली जाते. परंतु या विचित्र विकृत ख्रिश्चन धर्मगुरूंच्या प्रकारामुळे आळंदीचा वातावरण दूषित झाले. हिंदू धर्मीय आक्रमक झाले. भविष्यामध्ये अशा कृती होऊ नये.
राज्य व केंद्र सरकारने धर्मांतर बंदी कायदा करावा यासाठी सक्षमपणे जागृत होत हिंदू धर्माचे मोर्चाचे विराट जन मोर्चामध्ये रूपांतरित झालेले दिसले. अयोध्येच्या साधू आखाड्याचे महंत सुनील शास्त्री महाराज यांचे महाद्वारातून होणारे मार्गदर्शन ऐकण्यासाठी. मोठ्या प्रमाणात महिला,वारकरी ,ग्रामस्थ आळंदीकर यांची विराट गर्दी महाद्वाराच्या समोर पाहायला मिळाली, सुनील शास्त्री महंत यांनी आपल्या भाषणामध्ये ख्रिश्चन धर्माच्या या विकृत कृतीचा निषेध करत, तीव्र ना पसंती व्यक्त केली, आणि भविष्यात असे प्रकार झाल्यास आक्रमकता दाखवत हिंदूंनी एकजूट करावी, धर्म रक्षणासाठी सर्वजण कार्यरत राहावे ,असे आवाहनही केले आहे
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!