दहिवडी प्रतिनिधी
न्हावऱ्यावरून तळेगाव ढमढेरेच्या ( तालुका शिरूर ) दिशेने वीट वाहून नेणारा ट्रक सकाळी सहाच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून म्हाळुंगी फाटा या ठिकाणी ट्रक पलटी झालेला असून ट्रक क्रमांक एम एच बारा एफ झेड 72 36 असून यामध्ये तीन ते चार व्यक्ती गंभीर जखमी झालेल्या असून जवळील शिक्रापूर या ठिकाणी जखमी झालेल्या व्यक्तींवर उपचार चालू आहेत.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अक्षय शिवले यांनी ट्रक मधील जखमी व्यक्तींना बाहेर काढण्यास मदत केली या राष्ट्रीय महामार्गावर अपघात याच ठिकाणी ही तिसरी वेळ अपघात होण्याची असून नित्य नियमाने अशा घटना घडत असून स्थानिक लोकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे की काय अशी शंका स्थानिक लोकांनी व्यक्त केली आहे .