तळेगाव ढमढेरे प्रतिनिधी
कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद शाळेमध्ये दुसरीत शिक्षण घेत असलेल्या विराज आदक याचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. अनर्थ खर्चाला फाटा देत शाळेमध्ये गरजेच्या मुलांना बसकर चटई देऊन इतर मुलांना प्रेरणादायी विचार दिले. या
स्तुत्य उपक्रमाचे कौतुकही करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांना केक, चाॅकलेट वाटण्याऐवजी शाळेसाठी गरजेच्या काही वस्तू भेट देऊन साधेपणात वाढदिवस साजरा करावेत तसेच आपला वाढदिवस कायमस्वरूपी स्मरणात राहील. अशी कल्पना वर्गशिक्षिका जयश्री विश्वास यांनी मुलांपुढे मांडली. याच अनुषंगाने विराजचा जवळच वाढदिवस आला होता. त्याने वर्गशिक्षिका यांना मी मुलांना बसकर अत्यंत आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिले. थंडीच्या दिवसात खाली फरशी गार पडली असते. दिवसा सुद्धा थंडीचा अनुभव मुलांना मिळतो. यासाठी बसकर उपयुक्त ठरेल हे लक्षात आल्यानंतर शाळेला १७ बसकर भेट दिली. मुलांची नेमकी अडचण समजून त्यांनी वर्गाला सहकार्य केले.त्यांचे आमच्या शाळेच्या व सर्व मुलांच्या वतीने आभार व अभिनंदन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक जयवंत भुजबळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिनीनाथ ढमढेरे, शिक्षक मनोज वाबळे, अंगणवाडी शिक्षिका जोशी मॅडम उपस्थित होते.