सुनिल भंडारे पाटील
सणसवाडी ( ता.शिरूर) येथील आमदार अशोक बापू पवार मंचाच्या वतीने सणसवाडी येथील वसेवाडी शाळा, जिल्हा परिषद मध्यामिक व उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा यांना खाऊचे वाटप करत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी वसेवाडी शाळेतील १७०० , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय १३०० ,जिल्हा परिषद शाळा सणसवाडी ७५० विद्यार्थी व विद्यार्थिनींना खाऊचे वाटप आमदार अशोक पवार युवा मंच्याच्या माध्यमातून पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांनी वाटप केले.
यावेळी सणसवाडी ग्राम पंचायतीच्या सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे,मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, माजी उपसरपंच विजयराज दरेकर ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, ललिता दरेकर,दिपाली हरगुडे, रामभाऊ दरेकर माजी चेअरमन सुहास दरेकर, हर्षल हॉटेलचे मालक सुभाष दरेकर, माजी ग्राम पंचायत सदस्या सुनीता उत्तम दरेकर, रामदास दरेकर, प्रशांत दरेकर, सुखदेव दरेकर,युवानेते निलेश दरेकर,उद्योजक नवनाथ हरगुडे सागर हरगुडे गणेश कानडे संतोष गोसावी सर प्राध्यापक अनिल गोटे व इतर मान्यवर उपस्थित होते.