सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील वाडेगाव फाटा छत्रपती ऑटो नजीक काल रात्री 10:00 वाजता झालेल्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला, या अपघातामुळे कोरेगाव भीमा गावावर शोककळा पसरली असून, पुणे महानगर महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे,
काल रात्री उशिरा झालेल्या या दुहेरी अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून संतोष काळूराम गव्हाणे राहणार कोरेगाव भीमा यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे, शिक्रापूर पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार, हिरो होंडा स्प्लेंडर व स्विफ्ट यांच्यात झालेल्या अपघातात महेश राजाराम गव्हाणे वय 25 वर्ष राहणार कोरेगाव भीमा फडतरे वस्ती याचा जागीच मृत्यू झाला, तसेच अपघाताच्या ठिकाणी त्याला उपचारासाठी घेण्यासाठी आलेले ॲम्बुलन्सला श्रीकांत उबाळे वय 26 राहणार ढेरंगे वस्ती कोरेगाव भीमा याची दुसरी दुचाकी धडकल्याने त्याचा देखील जागीच मृत्यू झाला, अशा विचित्र दुहेरी अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून याबाबतीत आज झालेल्या कोरेगाव भीमा ग्रामपंचायत येथील सभेमध्ये सर्वानुमताने महामार्गावर स्पीड ब्रेकर ची मागणी करण्यात आली, पुणे नगर महामार्गाच्या नूतनीकरणानंतर दुचाकी, चार चाकी, प्रवासी मालवाहतूक वाहने यांचा वेग वाढला असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे, तसेच अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे, वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर टाकने गरजेचे आहे, कोरेगाव भीमा ग्रामस्थांचा या मागणीचा लवकरात लवकर विचार व्हावा अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत, अपघाताचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस फौजदार अविनाश थोरात करत आहेत,