लोणी काळभोर प्रतिनिधी
पुणे:-दिनांक - ०३/०१/२०२३ तालुका (हवेली) अंमली पदार्थ विरोधी पथक - २, गुन्हे शाखा, पुणे शहर बंडगार्डन ताडीवाला रोड येथे परराज्यातील दोन व्यक्तींनी विक्रीसाठी आणलेल्या १६,३२,०००/-रु किं १ किलो ८८ ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक - २ कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर,चव्हाण तसेच पोलीस अंमलदार असे अंमली पदार्थ गैर-व्यवहाराचे अनुषंगाने विशेष मोहिम राबविणेबाबत आदेश झालेने बंडगार्डन पोलीस स्टेशन परीसरात दिनांक ०२/०१/२०२३ रोजी पेट्रोलींग करीत असताना,पोलीस अंमलदार, युवराज कांबळे यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, ताडीवाला रोड, पुणे येथे दोन इसम चरस हा अंमली पदार्थ विक्री करीता येणार आहे.
सदर मिळालेल्या बातमीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथक -२ कडील अधिकारी पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक, दिगंबर चव्हाण व अंमलदार यांनी के. टी. एम. या मोटार सायकलवर बसलेले इसम १)अमीर मसिउल्ला खान, वय २४, रा. यासीन अपार्टमेन्ट, ताडीवाला रोड, पुणे व मुळगाव - दावा, गंज दुडवारा, तहसील पटीयाली, जि.कासगंज राज्य - उत्तर प्रदेश २ ) अतुल गौतम वानखडे,वय-२२,रा.यासीन अपार्टमेन्ट,ताडीवाला रोड, पुणे व मुळगांव- तथागतनगर, शिक्षक कॉलनी, ता. खामगाव, जि. बुलढाणा या दोघा आरोपीचे ताब्यातुन एकुण १६,३२,००० /- रू किचा १ किलो ८८ ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ १,५०,०००/- रू किची एक डयुक कंपनीची के. टी. एम. मोटर सायकल व २०,०००/- रू कि चे दोन मोबाईल असा संच असा एकुण १८,०२,०००/- रू चा अंमली पदार्थ व इतर ऐवज संगनमताने अनाधिकाराने, बेकायदेशीर रित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्या दोघांच्या विरुध्द पोलीस अंमलदार युवराज कांबळे यांनी बंडगार्डन पोलीस ठाणे, एन. डी. पि. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), २९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक, एस. डी. नरके, अंमली पदार्थ विरोधी पथक, २ गुन्हे शाखा पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा.सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २, नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक - २, गुन्हे शाखा, पुणे शहरकडील पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक, दिगंबर चव्हाण, पोलीस उप निरीक्षक, एस.डी.नरके, पोलीस अंमलदार, संतोष देशपांडे, युवराज कांबळे, योगेश मांढरे, संदिप जाधव, चेतन गायकवाड,नितीन जगदाळे, साहिल शेख, आझीम शेख, दिशा खेवलकर व दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.