पुण्यातील कोयता गँग वर पोलिसांची करडी नजर..भाईगिरी करणाऱ्यांची काढली पुणे पोलिसांनी वरात.

Bharari News
0
लोणी काळभोर प्रतिनिधी 
      शहरातील ‘कोयता गँग’चा विषय विधीमंडळात गाजत असताना आंबेगाव येथील सिंहगड विधी महाविद्यालय परिसरात कोयता घेऊन दोघांनी दहशत निर्माण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. आरोपींनी वाहनांबरोबरच दिसेल त्या व्यक्तींवर आणि दुकानांवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला.   
  अचानक घडलेल्या या घटनेने घाबरलेले नागरिक पळत सुटले होते. गस्तीवर असलेल्या सिंहगड पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून यातील एका अल्पवयीनाला पकडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.करण दळवी (रा.,वडगाव) आणि त्याचा अल्पवयीन साथीदार अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलांची नावे आहेत. त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न आणि आर्म अॅक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलिसांच्या हद्दीत घडली. मात्र, जवळच सिंहगड पोलीस ठाण्याचे मार्शल असल्याने त्यांनी पाठलाग करून आरोपीला पकडले.आंबेगाव येथील सिंहगड विधी महाविद्यालय परिसरात कोयता घेऊन दोघांनी दहशत निर्माण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. त्याच ठिकाणी पुणे पोलिसांनी कोयता गँग ची वरात काढली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!