सुनील भंडारे पाटील
चुकीचे वक्तव्य करून हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथे राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार, खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे, अमोल मिटकरी यांचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आला,
यावेळी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळी शंभू वंदना, समाधीच्या पूजनाने निषेध सभेची सुरुवात झाली, लोकनेत्यांच्या धर्मवीर शंभुराजे, हिंदू धर्म, देव- देवतांवर चुकीच्या वक्तव्यावर आता हिंदू लोक पेटलेली असून, संबंधित लोक नेत्यांविषयी राग व संतापाची लाट मनात उसळी आहे, अशा स्वरूपाचे वक्तव्य आणि स्पष्ट मत उपस्थतांनी व्यक्त केले आहे, यावेळी आंदोलनाचे नियोजन सकल हिंदु समाज श्री तिर्थक्षेत्र वढू बुद्रूक यांच्या वतीने करण्यात आले होते,
याप्रसंगी बोलताना शिरीष महाराज मोरे (श्री संत तुकाराम महाराज यांचे 13 वे वंशज, देहू संस्थान) यांनी सांगितले की, राजकारण्यांना इतिहासाची जाणीव नाही, आमचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर का नाही? तारुण्याच्या आरंभी शंभूराजांनी मुस्लिमांना निस्तनाभूत करण्याची शिक्षा वडिलांकडून घेतली, त्यांच्या आजोबा श्री शहाजी महाराजांना हिंदू धर्म जीर्णोधारक म्हणतात, 1684 साली इंग्रजाबरोबर बरोबर तह करताना, माझ्या प्रजेचा धर्मांतर करता येणार नाही, तसेच इतर धर्मात गेलेल्यांची घर वापसी केली, मोगलांनी पाडलेली मंदिरे उभारली, 40 दिवस हाल सहन केले तरी मुस्लिम धर्म स्वीकारला नाही, यावरून धर्मवीर ही उपाधी सार्थ होते,
अक्षय महाराज भोसले (धर्मवीर आध्यात्मिक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष) यांनी सांगितले की भडक बोलायचे नाही परंतु जे आपल्या धर्मावर टीका करतात त्यांना धर्माचे रक्षण करता येत नाही अशा भडव्यांबद्दल बोलले पाहिजे, हिंदू धर्माचा विकास खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय यांनी केला, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे तुकोबारायांनी सांगितले, ज्यांना धर्म कळत नाही त्यांनी धर्मवीर या शब्दावर बोलू नये, आमच्या दोन्ही छत्रपतींच्या नावावर तुम्ही राजकारण करता निवडून येता या भडव्यांना आता सांगायची गरज आहे की तुला कोणी मोठा केला,आम्ही शंभूराजांना धर्मवीर का म्हणतो आमच्या आई -वडिलांनी सांगितलय, धर्मवीर कसे पाहायचे असेल ना टीका करणारानी एकदा वढुत ये लोकं आता चपलाने हाणतील ना मग कळेल, ज्यांना धर्मवीर शब्दाविषयीची शंका आहे त्यांनी आईला विचारावे, आई जसे बा बा बा करून बाप शिकवते तसे या भडव्यांना शिकवण्याची गरज आहे, हे तिघेजण जाणीवपूर्वक तरुणांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत, मागेही या गावाने खूप मोठे संकट झेलले आहे, 700 वर्षांपूर्वी रेड्याला समजलं कोणाच्या मागे जायची परंतु आत्ता या दोन पायाच्या म्हशीला समजलं नाही असे विधान करत सुषमा अंधारे यांना देखील महाराजांनी चांगलाच झटका दिला, या ठिकाणी बऱ्यापैकी राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे व इतर पक्षाची मंडळी आहेत पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपण हिंदू म्हणून एक झालं पाहिजे,
, धर्मजागरण प्रमुख योगेशजी सासवडे यांनी देखील आपले मत व्यक्त करून धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते असे ऐतिहासिक पुराव्यानिशी सर्वांना पटवून दिले, यावेळी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार, खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे, अमोल मिटकरी यांच्या विषयी निषेध निषेध निषेध अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथील धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळावरील एकंदरीत शंभू प्रेमींचा उद्रेक पाहता आता या पाचही नेत्यांची चांगलीच कोंडी होणार आहे,