खेड प्रतिनिधी लतिफ शेख
1992 मध्ये पि डी सी सी बँक शाखा कुरकुंडी स्थापन झाली. तिसावा वर्धापन दिन बाजार समितीचे सभापती रमेश राळे , भैरवनाथ विद्यालय किवळे मुख्याध्यापक रामदास साळुंके ,शाखा व्यवस्थापक अंकुश राळे, लेखापाल ढोरे ,बोरकर, हे सर्व बँक कर्मचारी व कुरकुंडी गावातील ग्रामस्त या कार्यक्रमास उपस्थित होते.
प्रास्ताविक चेअरमन भोकसे यांनी केले तर मनोगत सभापती रमेश राळे यांनी केले यामध्ये शेतकरी पीक कर्ज, इतर कर्ज, शिक्षक कर्मचारी पगार, सोने तारण , यामुळे शेतकऱ्यांना लाभ होत आहे. यापूर्वी या परिसरातील लोकाना कडूस पाईट किंवा खेड तालुक्यात बचत किंवा कर्जासाठी जावे लागत असे परतु या शाखेमूळे परीससरातील चांदूस ,किवळे, कुरकुंडी, कोये,आसखेड,शेलू,कोरेगाव, येथील लोंकाना बँकेमुळे बचत ठेवण्याचा किंवा शेती कर्जाचा लाभ घेता येतो बँक कर्मचारी परिसरातील लोंकाना चांगल्या प्रकारे सेवा देत असून सहकार्य करत आहे यामूळे बँकेची आर्थिक उलाढाल वाढत आहे बँक व्यवस्थापक अंकूश राळे व रौधळ यांचा यावेळी सत्कार करण्यात आला .यावेळी बँकेचे कॅशिअर ढोरे यांनी सर्वांचे स्वागत व सत्कार केले.