गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात
हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्यर्य,चारित्र्य, पराक्रम व संघटन अशा सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राष्ट्रमाता, राजमाता माॅसाहेब जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती विविध उपक्रमांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमोने (ता.शिरूर)येथे साजरी करण्यात आली.
शाळेमध्ये प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला या दरम्यान विद्यार्थी व शिक्षकांनी या महान पुरुषांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. सदस्य सुषमा भाऊसाहेब काळे या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या.
यादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊंची वेशभूषा व स्वामी विवेकानंदांची वेशभूषा करून सर्व उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी अनेक मान्यवरांनी स्वराज्याच्या मार्गदर्शक राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती व युवा दिन यांच्यावर आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी
घो.संचालक व सरपंच संजयआबा काळे, उपसरपंच डॉ. संतोष जाधव, मा. उपसरपंच संदीप गव्हाणे, सोसायटी विद्यमान चेअरमन दत्तात्रय जगदाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल थोरात , नानासाहेब रसाळ सर, शामराव जगताप सर,ग्रा. सदस्य सागर काळे, सारिका काळे( माता पालक), मंदाताई काळे (महिला पालक) तसेच शाळेचे मुख्याध्यापक सच्चिदानंद थेऊरकर, श्रीमती. प्रेमलता साळुंके मॅडम, चंदना घोरपडे मॅडम, वंदना दुर्गे मॅडम, मीनाक्षी रसाळ मॅडम, श्वेता करपे मॅडम या सह शिक्षक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक थेऊरकर सर यांनी मानले.