सुनील भंडारे पाटील
लोणीकंद येथील श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने आज राष्ट्रीय युवक दिन व राजमाता जिजाऊ जयंती दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रम प्रसंगी श्री रामचंद्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती (बापू ) भूमकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बाजारपेठेतील मागणी आणि जागतिक स्पर्धेला तोंड देताना इनोव्हेशन कसे साध्य करता येईल यावर बोलताना युवकांनी सक्षम असायला हवे व राजमाता जिजाऊ चा आदर्श घेऊन महिलांनी पुढील युवक घडवण्याचे काम केले पाहीजे.
तसेच प्राचार्य डॉ अविनाश देसाई यांनी उपस्थिथना मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी विध्यार्थी व शिक्षकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भर देण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते, कार्यक्रमकाचे आयोजन प्रा. एस. पाटील, प्रा. तेजस्वी हुडे, प्रा. बी. शिंदे, प्रा. बी बोरुडे, प्रा. वि. गायकवाड यांनी केले.