सुनील भंडारे पाटील
सद्यस्थितीत देशामध्ये तसेच आपल्या राज्यामध्ये लव जिहादचे अनेक दुष्परिणाम समोर येत असून असे प्रकार थांबण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पावले उचलण्यात आली असून, वाघोली तालुका हवेली येथील वाघेश्वर मंदिरामध्ये शनिवार दिनांक 21/1/2023 रोजी सायंकाळी 6:00 वाजता व्याख्यान सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे,
विश्व हिंदू परिषद नियमितपणे धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम करीत असते, देव,देश,धर्म, याविषयीचे कार्य चांगले असून, प्रत्येकाची एक कुटुंब व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीचे माहिती व जनजागृती करण्यासाठी हे व्याख्यान सत्र आयोजित केले आहे, महिलांवर होणारे अत्याचार, फसवणूक, लव जिहाद या विषयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर सह धर्म जागरण प्रमुख मिलिंद वायकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे, यावेळी कार्यवाह रा स्व संघ पुणे महानगर महेश करपे, कार्यवाह रा स्व संघ वडगाव शेरी भाग कृष्णकांत सातव, संजय मुद्राळे, शिवाजी गोते, ऍडव्होकेट सतीश गोरडे, शांताराम कावरे, धनंजय गायकवाड, अनुराधा भोसले, संतोष अनघोळकर,नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार असून, या व्याख्यान सत्राचे आयोजन विश्व हिंदू परिषद वडगाव शेरी भाग पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांनी केले आहे, जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे,