खेड प्रतिनिधी लतीफ शेख
शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित चाकण या संस्थेची निवडणूक झाली होती .आज बुधवार रोजी निवडून आलेल्या संचालका पैकी भैरवनाथ विद्यालय कुरळीचे मुख्याध्यापक ,व महाराष्ट्र राज्य मुख्याद्यापक महामंडळाचे कार्याध्यक्ष, मधुकरराव नाईक, यांची अध्यक्ष म्हणून तर संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयाचे चौधरी राजेंद्र, याचीं सचिव म्हणून तर भामचंद्र विद्यालय भांबोलीचे देवकाते हरिदास यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडून आलेले सभासद यामध्ये आदलिंगे विलास, कड अविनाश,काळे संतोष, घेनंद पांडुरंग , घोरपडे सरिता, टोपे एकनाथ, पवार विजय ,मूळे बाळासाहेब, शेलार नंदकुमार, आव्हाड प्रशांत , प्रिती खराबी,अंजली शेरकर ,या निवडनून आलेल्या संचालकामधून पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
या पतसंस्थेचे एकूण सभासद 240 असून यापैकी 177 सभासदांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला होता .या पतसंस्थेतून सभासदांना वीस लाखाची कर्जवाटप करण्यात येते.पतसंस्थेचे स्वतंत्र कार्यालय चाकण येथे आहे.
मधुकरराव नाईक अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर सभासद शिक्षकाचे सर्व आर्थिक प्रश्न पतसंस्थेच्या माध्यमातून सोडवण्याचा मी प्रयत्न करेल. तसेच पतसंस्थेतील सभासद वाढविणे, कर्ज मर्यादा वाढ करून कमी व्याजदराने वाटप करण्याचा तसेच येणाऱ्या काळात पतसंस्था सर्व कारभार ऑनलाईन करण्याचा माझा मानस आहे. असे विचार व्यक्त केले.
अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना अध्यक्ष रामदास रेटवडे व सचिव लतीफ शेख तसेच माध्यमिक शिक्षक परिषदेचे कार्यवाह अरविंद गवळे गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष योगेश माळशिरसकर , तसेच मुख्याध्यापक व माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी संघाचे पदाधिकारी यांच्यावतीने नाईक यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला.