सुनील भंडारे पाटील
पत्रकारांच्या लेखणीचा उपयोग हा समाजहितासाठी झाला पाहिजे,एखाद्या बातमीमुळे आपले कौतुक करून घेण्याच्या नादात समाजाच्या अहित तर आपल्या कडून घडत नाहि ना याचा प्रामाणिक विचार व्हावा असे प्रतिपादन राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केन्द्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी पुणे जिल्हा पत्रकारांच्या वार्षीक आढावा बैठकित बोलताना केले.
दहा वर्षी पेक्षा जास्त काळ पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारांची नोंदणी शासनाने करायला पाहीजे,जेणे करून त्यांना शासकीय सवलती मिळू शकतील असे सुध्दा कुलथे म्हणाले.कार्यक्रमाचे आयोजन राज्य मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजयराव लोखंडे उपाध्यक्ष सुनिल भंडारे,जिल्हा सचिव शंकर पाबळे,जिल्हा संघटक साहेबराव आव्हाळे,जिल्हा संपर्क प्रमुख विजय थोरात,यांच्या सह जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष यांनी केले होते.जिल्ह्यातील खेड, आंबेगाव,मावळ,शिरूर,हवेली,दौड, बारामती तालुक्यासह पुण्यातील शहरातील असंख्य पत्रकार यावेळी उपस्थित होते.
या राज्य मराठी पत्रकार परिषद पत्रकार संघटनेचे सर्व पुणे जिल्हा व तालुकास्तरीय सर्व पदाधिकारी,सदस्यांचे स्मार्ट ओळखपत्राचे सुध्दा वितरण याप्रसंगी करण्यात आले.पत्रकार संघटनेला सलग्न असलेल्या महिला मंचच्या सदस्यांना सुध्दा मार्गदर्शन करण्यात आले.महिलांनी स्वतः च्या रक्षणा सह आपल्या आजुबाजू असलेल्या माहीला वर होणाऱ्या अन्यायाशी मुकाबला करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहण कुलथे यांनी केले.या प्रसंगी महिला मंचच्या जिल्हाध्यक्ष पदी अलका सोनवणे यांची निवड जाहिर करण्यात आली.
याप्रसंगी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष विजयराव लोखंडे,जिल्हा उपाध्यक्ष सुनील भंडारे पाटील,जिल्हा संघटक साहेबराव आव्हाळे,जिल्हा सचिव शंकर पाबळे,जिल्हा संपर्क प्रमुख विजय थोरात,जिल्हा कार्याध्यक्ष गौतम पिसे,पत्रकार क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम डफळ,हवेली तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटेकर,खेड तालुकाध्यक्ष गौतम लोखंडे,जिल्हा महिला पत्रकार प्रतिनिधी प्रिती पाठक,वडगाव शेरी विभाग अध्यक्ष किशोर उकरंडे,शिरूर तालुका संघटक विनायक साबळे,खेड तालुका उपाध्यक्ष गणेश वाळुंज,इंदापूर तालुका उपाध्यक्ष संतोष घोडके,संभाजी चौधरी,गणेश पाटोळे,भरत घावटे,शरद टेमगिरे,बाळासाहेब जाधव,अशोक नाळे,शिवाजी ठवरे,जयसिंग कांबळे,भारत चव्हाण,एकनाथ थोरात,मणियार याकूब,मनोहर गोरगल्ले,सुनील वाघचौरे,देवेंद्र ओव्हाळ,आदी जिल्ह्यातील सदस्य उपस्थित होते.यावेळी या कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून मदत केल्याबद्दल वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे,माजी सरपंच शिवदास उबाळे यांचे आभार संघटनेच्या वतीने मानण्यात आले.या कार्यक्रमावेळी स्वागत व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विजयराव लोखंडे यांनी केले.तर आभार जिल्हा उपाध्यक्ष सुनील भंडारे यांनी मानले.