लोणी काळभोर प्रतिनिधी
लोणी काळभोर (ता हवेली) येथे श्री संत सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळा मुक्कामी विसावला. श्री संत बाळूमामा पालखी सोहळा रामदरा लोणी काळभोर (ता-हवेली) येथील मुक्काम उरकून म्हातोबा आळंदी मार्गस्थ झाली आहे. याबाबत माहिती देताना. लोणी काळभोर मधील महंत हेमंत पुरी १००८ महाराज बोलत होते की, लोणी काळभोर पालखी क्रमांक ०९ असून यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १८ पालख्या आहेत. जवळपास ४५ हजार बकरी असून नंबर ०९ मध्ये अंदाजे १००० बकरी आहेत. दि. २५ बुधवार ते २९ दि. रविवार,पर्यंत लोणी काळभोर मधील रामदारा मुक्कामी असलेल्या पालखी निमित्ताने रामदारा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परतीच्या वेळेस या पालखी सोहळ्याचे ढोल ताशांच्या तसेच साऊंड सिस्टिम द्वारे, लेझीम खेळत वाजत गाजत प्रस्थान करण्यात आले. लोणी काळभोर रामदारा परिसरातील भाविक भक्तांनी व लांबून आलेल्या पर्यटक भक्तांची श्री बाळूमामा यांची बकरी पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. या पालखीला ग्रामपंचायत लोणी काळभोर व ग्रामपंचायत कदमवाक वस्ती ग्रामस्थांनी सहकार्य केले. तसेच आगमनापासून ते प्रस्थाना पर्यंत रोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पुढील मुक्काम हा म्हातोबा आळंदी येथे आहे.